अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध वारी हनुमान येथील ‘मामा-भाच्याच्या डोहात’ शनिवारी दुपारी दुर्दैवी घटना घडली. दर्शनासाठी आलेल्या तीन भाविकांपैकी एक युवक नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली असून, दोघांना स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, एका युवकाचा अद्याप शोध लागलेला नसून शोधमोहीम सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारी हनुमान येथे दुपारी सुमारे 1.30 वाजता दर्शनासाठी आलेले तीन भाविक आंघोळीसाठी आणि पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले होते. यावेळी तिघेही पाण्यात बुडू लागले. स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत दोघांना सुरक्षित बाहेर काढले.
मात्र, योगेश प्रकाश वानखेडे (वय 22), रा. फूटपुरी, ता. खामगाव, जि. बुलढाणा हे पाण्यात बेपत्ता झाले. स्थानिक नागरिक, हिवरखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि महसूल प्रशासनाकडून शोधकार्य सुरू असून, वृत्त लिहिपर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.






Leave a Comment