Ads

अकोला रोडवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू

By Nilesh Sir

July 29, 2026 12:53 pm

Ads

अकोट : अकोला रोडवरील बैठक बारसमोर ट्रकच्या धडकेत अंदाजे 35 ते 36 वर्षीय अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, आकोट शहर पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान अकोला रोडवरील बैठक बारसमोर हा भीषण अपघात झाला. आकोट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या अपघातात ट्रकची धडक बसल्याने अंदाजे 35 ते 36 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला.

मृत व्यक्तीच्या डाव्या हातावर “अनन्य” तर उजव्या हातावर “अकक्षरा” अशी नावे गोंदवलेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या महत्त्वाच्या खुणांच्या आधारे मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी आकोट ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अपघातातील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून चालकाला आकोट शहर पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेचा पुढील तपास आकोट शहर पोलीस करत आहेत. मृत व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकांची ओळख पटत असल्यास नागरिकांनी तात्काळ आकोट शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!