Ads

NEET पेपरफुटीचा आणखी एक बळी? डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरं; अंकिता सांगळेच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

By Nilesh Sir

July 27, 2026 11:18 am

Ads

NEET पेपरफुटीच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडवून दिल्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित आणखी एका विद्यार्थिनीच्या मृत्यूने गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंकिता सांगळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न अधुरं राहिल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अंकिताला डॉक्टर व्हायचं होतं. वैद्यकीय शिक्षणासाठी तिने NEET परीक्षा दिली होती. पहिल्या प्रयत्नात तिला चांगले गुण मिळाले होते. मात्र, त्यानंतर NEET पेपरफुटीचं प्रकरण समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली.

त्यानंतरच्या प्रयत्नात अंकिताला १६६ गुण मिळाले. मात्र, वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक कट-ऑफ १७७ गुण असल्याने तिला प्रवेश मिळू शकला नाही. प्रवेश न मिळाल्याने ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

याच पार्श्वभूमीवर अंकिताने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलिसांना तिच्याकडून एक चिठ्ठीही सापडल्याचे सांगण्यात येत असून, त्यात तिने आपल्या मनातील व्यथा आणि आत्महत्येमागील कारणांचा उल्लेख केल्याची माहिती आहे. या चिठ्ठीतील मजकुराबाबत अधिकृत तपासातूनच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.

NEET पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

या घटनेमुळे NEET पेपरफुटी आणि त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक परिणाम पुन्हा चर्चेत आला आहे. पेपरफुटीमुळे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

खासदार नीलेश लंके यांची सरकारवर टीका

अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी या घटनेची दखल घेत अंकिताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. अंकिताच्या मृत्यूला सरकारला जबाबदार धरत, NEET पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

अंकिताच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणाऱ्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने NEET परीक्षेतील गैरप्रकार, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि त्यांच्या भवितव्याच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अंकिताच्या मृत्यूला नेमकी कोणती कारणे कारणीभूत ठरली, तिच्या चिठ्ठीत काय नमूद आहे आणि NEET पेपरफुटीशी तिच्या मृत्यूचा थेट संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!