Ads

प्रतिष्ठित व्यापाऱ्यास धनादेश अनादर प्रकरणी सहा महिन्यांचा कारावास

By Nilesh Sir

July 7, 2026 3:46 pm

Ads

अकोला | प्रतिनिधी धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात अकोला येथील ५वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याला दोषी ठरवत सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची तसेच २ लाख ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली.

या प्रकरणातील फिर्यादी हरिमोहन शुक्ला असून, आरोपी विठ्ठल नागोराव चौरे (प्रोप्रायटर, ओम साई व्हाईट कोल इंडस्ट्रीज) आहेत. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, आरोपीने २०१६ मध्ये व्यावसायिक अडचणीमुळे फिर्यादींकडून टप्प्याटप्प्याने १ लाख ४१ हजार रुपयांची आर्थिक मदत घेतली होती. त्यापैकी कायदेशीर देय रक्कम फेडण्यासाठी आरोपीने ४० हजार आणि १ लाख रुपयांचे दोन धनादेश दिले होते.

मात्र, फिर्यादींनी हे धनादेश बँकेत सादर केले असता ते “Funds Insufficient” या कारणाने अनादरित झाले. त्यानंतर फिर्यादींनी कायदेशीर नोटीस पाठवून १५ दिवसांत रक्कम भरण्याची मागणी केली. मात्र, नोटीस मिळूनही आरोपीने रक्कम अदा केली नाही किंवा नोटिशीला उत्तर दिले नाही. त्यामुळे फिर्यादींनी परक्राम्य लिखत अधिनियम (Negotiable Instruments Act) कलम १३८ अंतर्गत न्यायालयात दावा दाखल केला.

या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ५वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. आर. सय्यद यांनी ६ जुलै २०२६ रोजी निकाल देत आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा तसेच २ लाख ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात फिर्यादींची बाजू ॲड. धीरज मोहन शुक्ला यांनी मांडली.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!