Ads

अखेर अकोला–लोणाग्रा एसटी सेवा पुन्हा सुरू; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

By Nilesh Sir

July 6, 2026 2:00 pm

Ads

खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश; दोन वर्षांनंतर धावली अकोला–लोणाग्रा बस सेवा

दोन वर्षांपासून बंद असलेली अकोला–लोणाग्रा मार्गावरील एसटी बस सेवा अखेर पुन्हा सुरू झाली आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुराव्यानंतर सुरू झालेल्या या सेवेमुळे विद्यार्थी, नागरिक आणि प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांच्या वतीने चालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला.

अकोला ते लोणाग्रा मार्गे कंचनपूर–मांजरी या मार्गावरील एसटी बस सेवा तब्बल दोन वर्षांपासून बंद होती. त्यामुळे परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना शहरात ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः अहिल्याबाई होळकर प्रवास पास योजनेअंतर्गत पास मिळालेल्या विद्यार्थिनींना नियमित शिक्षणासाठी प्रवास करणे कठीण झाले होते.

ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत खासदार अनुप धोत्रे यांनी राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करून ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर अकोला–लोणाग्रा मार्गे कंचनपूर–मांजरी एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. एसटी सेवा सुरू झाल्यानंतर कंचनपूर, लोणाग्रा, अमनतपूर आणि बदलापूर येथील ग्रामस्थांनी चालक रमेश दोळे आणि वाहक अनिल रोकडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

तसेच बसस्थानक प्रमुख सौ. राखी खोटरे मॅडम आणि वाहतूक निरीक्षक तेलगोटे साहेब यांचेही आभार मानण्यात आले. या नव्या सेवेमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!