मोहरम उत्सव शांततापूर्ण आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम चोहोट्टा बाजार येथे गुरुवारी पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासोबतच कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला. गावातील प्रमुख रस्ते, चौक आणि संवेदनशील भागातून पोलिसांनी पायी संचलन करत परिस्थितीचा आढावा घेतला.

या रूट मार्च दहीहंडा पोलीस स्टेशन ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पोलीस अधिकारी, १६ पोलीस अंमलदार आणि १८ होमगार्ड जवान सहभागी झाले होते. पोलिसांनी नागरिकांना मोहरम उत्सव शांतता, सामाजिक सलोखा आणि परस्पर सहकार्याच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.
सण-उत्सवांच्या काळात अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद बाब तातडीने पोलिसांना कळवावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या रूट मार्चमुळे परिसरात सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ झाला असून, नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.






Leave a Comment