Ads

दहिहंडा पोलिसांची प्रामाणिकता; तब्बल २ लाखांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग महिलेला सुखरूप परत

By Nilesh Sir

June 22, 2026 11:24 am

Ads

दहिहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील देवरी फाटा परिसरात एका महिलेची मौल्यवान दागिन्यांनी भरलेली बॅग हरवली होती. मात्र, वाहतूक पोलिसांच्या तत्परता आणि प्रामाणिकपणामुळे ही बॅग सुरक्षितपणे संबंधित महिलेला परत मिळाल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शारदा प्रभूदास गावंडे, रा. सांगूळद या महिला देवरी फाटा येथील सह्याद्री हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबल्या होत्या. यावेळी त्या आपली कॉटन बॅग तेथेच विसरून गेल्या.

यानंतर त्यांनी विशाल कवलवकर यांच्यामार्फत माहिती दिल्यानंतर ड्युटीवर असलेले वाहतूक पोलीस सुनील मानकर आणि वाहतूक कर्मचारी दहिकर तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बॅग ताब्यात घेतली.

महिला घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत बॅगची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १२ ग्रॅमची सोन्याची पोत, ५ ग्रॅमचे कानातले, ६ ग्रॅमचे सोन्याचे डोरले, ५ ग्रॅमचे ॐ पेंडंट आणि ३ ग्रॅमची अंगठी असा अंदाजे २ लाख रुपयांचा ऐवज आढळून आला.

त्यानंतर सर्व मौल्यवान दागिने संबंधित महिलेच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आले.

ही संपूर्ण कार्यवाही पोलीस ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस सुनील मानकर आणि वाहतूक कर्मचारी दहिकर यांनी पार पाडली.

या प्रामाणिक आणि तत्पर कामगिरीमुळे दहिहंडा पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होत असून, “पोलिसांमुळे लाखमोलाचा ऐवज सुरक्षित परत मिळाला” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

No comments to show.

Leave a Comment