Ads

चोहोट्टा बाजारात अवैध धंद्यांचा सुळसुळाट! वीटभट्ट्या, वाळू माफिया मोकाट; महसूल विभाग मूकदर्शक?

By Nilesh Sir

April 14, 2026 7:00 am

Ads

अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार महसूल मंडळात अवैध वीटभट्ट्या, बेकायदेशीर वाळू उपसा आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली रेती वाहतूक यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण परिसरात खुलेआम सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोहोट्टा बाजार महसूल मंडळातील अनेक गावांमध्ये शेकडो वीटभट्ट्या सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी बहुतांश वीटभट्ट्यांकडे आवश्यक परवाने, पर्यावरणीय मंजुरी किंवा शासनाची अधिकृत परवानगी नसल्याचे आरोप आहेत. तरीही या भट्ट्या पूर्ण क्षमतेने सुरू असून, महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

या सर्व प्रकारांमागे एका प्रभावशाली लोकप्रतिनिधीच्या कार्यक्षेत्रातील ‘आशीर्वाद’ असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळेच प्रशासनावर दबाव असून कारवाई टाळली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, अपर जिल्हाधिकारी स्तरावरून पाहणी झाल्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने “कारवाईचा दिखावा” केल्याचा आरोप होत आहे.

याशिवाय, वीटभट्ट्यांशी संबंधित रॉयल्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा होत असल्याची माहिती समोर आली आहे. हजारो ब्रास माती वापरूनही पंचनाम्यात कमी प्रमाण दाखवले जात असल्याचा आरोप आहे. उर्वरित रक्कम ‘सेटलमेंट’च्या माध्यमातून वळवली जात असल्याने शासनाच्या महसुलाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याची चर्चा आहे.

अवैध वीटभट्ट्या आणि वाळू माफियांचा हा खेळ थांबवण्यासाठी प्रशासन कधी जागे होणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

चोहोट्टा बाजार परिसरातील ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षाचे नव्हे, तर संभाव्य संगनमताचेही द्योतक आहे. आता तरी महसूल विभाग कठोर कारवाई करणार का, की हा अवैध धंदा असाच सुरू राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment