Ads

जिल्ह्यातील तिसऱ्या हत्येचा देखील उलघडा, रिधोरा शेतातील कुजलेल्या मृतदेहाचा ४८ तासांत उलगडा; अकोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोन आरोपी अटकेत

By Nilesh Sir

March 28, 2026 6:35 pm

Ads

अकोला जिल्ह्यात तीन दिवसात तीन हत्या मुळे जिल्हा पुरता हादरून गेला याच आता रिधोरा शेतशिवारात रामनवमीच्या दिवशी म्हणजेच २६ मार्च रोजी कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या अनोळखी मृतदेहाच्या प्रकरणाने खळबळ उडवली होती. प्रथमदर्शिय पाहता हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याची दाट शंका पोलिसांनी व्यक्त केली मात्र उन्हामुळे मृतदेह ओळखणे अवघड झाले असतानाही स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांत या प्रकरणाचा उलगडा केला. केवळ कपडे आणि घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंवरून पोलिसांनी मृताची ओळख पटवून दोन आरोपींना अटक केली. या हत्येमागचे कारणही समोर आले असून, दारूच्या नशेत झालेल्या वादातून हा खून झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अकोला पोलिसांच्या या तपासाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. नेमकं काय घडलं? आरोपी कसे पकडले गेले? संपूर्ण प्रकरण जाणून घ्या या सविस्तर बातमीत.

रिधोरा गावाजवळील शेतशिवरात सापडलेला कुजलेला मृतदेह; तपासाची मोठी कसरत

अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रिधोरा शेतशिवारात 26 मार्च रोजी एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. उन्हाच्या तीव्रतेमुळे मृतदेहाची अवस्था अत्यंत विद्रूप झाली होती, ज्यामुळे त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले.

या घटनेनंतर “रिधोरा जंगलातील मृतदेह”, “अकोला हत्या प्रकरण”, “स्थानिक गुन्हे शाखा तपास” हे मुद्दे चर्चेत आले. घटनास्थळी पोलीस पथक दाखल होताच प्रथमदर्शनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

कपड्यांवरून ओळख, ४८ तासांत आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेत दोन विशेष पथके तयार केली. मृतदेहावरील कपडे आणि सापडलेल्या वस्तूंवरून आसपासच्या गावांमध्ये शोधाशोध केला असता तपास करणाऱ्या पोलिसांना सुगावा लागण्यास सुरुवात झाली आणि कडी कडी जोडून अकोला स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने अखेर शोध लावलाच मृताची ओळख सचिन वाल्मीक खंडारे (वय 29, रा. अमानतपूर ताकोडा) अशी पटली.

यानंतर पोलिसांनी मृताच्या हालचालींचा मागोवा घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये सचिन खंडारे हा आदेश सुधीर डोंगरे, वय २४ वर्ष, २) अभिषेक प्रकाश गवळी, वय २४ वर्ष दोन्ही रा. हाथरून ता. बाळापुर या दोन मित्रांसोबत मोटरसायकलवर जाताना दिसून आला.

संशयाच्या आधारे दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दारूच्या नशेत झालेल्या वादातून त्यांनी सचिनचा खून केल्याचे समोर आले.

पोलिसांनी एक आरोपी अमरावती येथून तर दुसऱ्याला जळगाव जिल्ह्यातून अटक केली. “अकोला गुन्हे शाखा”, “हत्या प्रकरण उलगडा”, “४८ तासांत तपास” या बाबींमुळे या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांची जलद कारवाई; वरिष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे

या प्रकरणात अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपास करत अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला.

पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत सूक्ष्म तपास करत आरोपींना पकडण्यात यश मिळवले. दुर्गम जंगलात सापडलेल्या कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटवणे आणि आरोपींपर्यंत पोहोचणे हे मोठे आव्हान होते, मात्र पोलिसांनी ते यशस्वीरित्या पार पाडले.

या धक्कादायक घटनेबद्दल तुमचे मत काय? अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना व्हायला हव्यात? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच अपडेट्ससाठी आमच्या पोर्टलला फॉलो करा.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!