Ads

मध्यरात्रीचा ‘राजकीय भूकंप’! ठाकरे गटाला अकोल्यात मोठा धक्का; शिंदे गटात मोठा प्रवेश

By Nilesh Sir

March 18, 2026 10:06 am

Ads

शहराच्या राजकारणात मध्यरात्री झालेल्या ‘शांत’ हालचालीने मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अकोला जिल्ह्यात मोठा धक्का बसला असून, महापालिकेतील काही महत्त्वाचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत.

मुंबईत मध्यरात्री दीडच्या सुमारास पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याने अकोल्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या अचानक घडामोडींमुळे “ही नवी राजकीय पहाट की आणखी एक पलटी?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या पक्षांतरात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे, नगरसेविका सुरेखा काळे, प्रभाग १२ मधील नगरसेवक सागर भारुका, प्रभाग ८ मधील मनोज पाटील तसेच नगरसेविका सोनाली सरोदे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा प्रवेश सोहळा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडल्याने या हालचालींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या घडामोडींमुळे अकोल्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षांतरामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याचे संकेत मिळत आहेत.

राजकीय जाणकारांच्या मते, ही केवळ सुरुवात असून आगामी काळात अकोल्यात आणखी मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे “अकोल्यात शिवसेना नेमकी कोणाच्या ताब्यात?” हा प्रश्न आता अधिकच चर्चेत आला आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!