Ads

पातुर तालुक्यात गुटखा तस्करीचा सुळसुळाट; व्हॉट्सअ‍ॅपवरून ‘हायटेक’ विक्रीचा पर्दाफाश, प्रशासनाचे दुर्लक्ष चर्चेत

By Nilesh Sir

March 17, 2026 10:26 pm

Ads

पातुर तालुका प्रतिनिधी पातुर तालुक्यात 57 ग्रामपंचायती चा समावेश असून 95 गावे ग्रामीण विभागातील समाविष्ट होतात तालुक्यातील आलेगाव येथे मोठ्या प्रमाणात शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखू मिश्रित गुटक्याची तस्करी वाढली असून सदर प्रतिबंधित गुटखा ग्रामीण विभागामध्ये गावागावांमध्ये पोहोचल्या जात आहे त्यामुळे प्रतिबंधित गुटक्याचे व्यसन ग्रामीण भागातील युवकांना लागत असून त्यांचे जीवन उध्वस्त होत आहेत.

विशेष बाब म्हणजे आता हे गुटखा विकणारे देखील हायटेक डिजिटल झाले असून आता व्हॉट्सअँप ग्रुपचा सहारा घेऊन गुटख्याचा माल आला असल्याची माहिती पुरविण्यात येत असून तो ओरिजनल आहे की डुप्लिकेट हे देखील सांगण्यात येते या ग्रुप मध्ये आसपासच्या ग्रामीण भागातील दुकानदार फेरीवाले ऍड करण्यात आले असून आता गुटखा विक्री देखील डिजिटल झाल्याचे ग्रामीण भागात सुरू आहे.

आलेगाव भाग हा महामार्ग सोडून आडपेटीत असल्यामुळे आलेगाव येथून गावागावांमध्ये प्रतिबंधित गुटक्याची वाहतूक केली जात आहे याकडे पोलीस प्रशासन आणि अन्न औषधी प्रशासन विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे आलेगाव येथे प्रतिबंधित गुटखा तस्करी करणाऱ्या व्यावसायिकाकडे चार ते पाच गडी माणसे कामावर असून अगदी प्रातःकाळीच प्रतिबंधित गुटक्याच्या मोठ्या बॅगा घेऊनगावा गावांमध्ये गुटका विक्री पोच केली जात आहे

आलेगाव येथील ठोकविक्रेता आपल्या गुटका विक्री व्यवसायाला लपविण्यासाठी समोरून वेगवेगळ्या पदार्थाची तथा अन्य पदार्थाचे विक्रीचे दुकान दाखवून आत मधून प्रतिबंधित गुटक्याची ठोक विक्री करत असल्याची चर्चा आहे पोलीस प्रशासन तथा अन्न औषधी प्रशासन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे सदर गुटखा विक्री वर पोलीस प्रशासन तथा अन्न औषधी प्रशासन विभागाने अंकुश लावावा अशी जनतेतून मागणी होत आहे

एकीकडे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने प्रहार मोहीम राबवली जात असून अवैद्य गुटका विक्री दारू विक्री वरली मटका आदीवर कारवाईची मोहीम राबवली जात आहे मात्र आलेगाव सह ग्रामीण विभागातील गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असून यावर पोलीस प्रशासन तथा अन्न औषधी प्रशासन विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने जनतेतून सवाल होत आहे मागील वेळी पोलीस प्रशासन तथा स्थानिक गुन्हे शाखेकडून आलेगाव येथे कारवाई करण्यात आली होती मात्र गुटखा विक्री होत असताना पुन्हा पुन्हा तोच व्यवसाय सुरू असताना त्यावर कारवाई का होत नाही असा सवाल होत आहे सदर प्रकरणी अकोला जिल्हापोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे

पातुर तालुक्यातील आलेगाव सह ग्रामीण विभागांमध्ये प्रतिबंधित गुटका विक्री बाबत फारसी माहिती नाही मात्र या प्रकरणी आढावा घेऊन कारवाई करण्यात येईल – रवींद्र सोळंके अन्न औषधी प्रशासन विभाग अधिकारी अकोला

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!