Ads

‘ऑपरेशन शोध’ यशस्वी! महिनाभर बेपत्ता तरुणीचा मागोवा; माना पोलिसांची दमदार कामगिरी

By Nilesh Sir

March 17, 2026 1:14 pm

Ads

मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील बेपत्ता झालेल्या तरुणीचा अखेर शोध लागल्याने कुटुंबीयांसह परिसराने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार माना पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. या घटनेनंतर कुटुंबीय आणि गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार गणेश नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन शोध’ मोहीम सुरू करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक माहिती, स्थानिक माहितीदार आणि विविध संपर्कांच्या माध्यमातून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. विशेष म्हणजे, संबंधित तरुण व तरुणी यांनी मोबाईल फोन बंद ठेवले असल्याने शोधमोहीम अधिक कठीण झाली होती.

तरीदेखील पोलिसांनी हार न मानता सातारा, नागपूर आणि भंडारा येथे सातत्याने शोधमोहीम राबवली आणि अखेर तरुणी भंडारा येथे एका आंतरजातीय तरुणासोबत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले.

यानंतर समुपदेशन करून कोणताही वाद निर्माण न होऊ देता तरुणीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले, तर संबंधित युवकालाही समज देण्यात आली.

माना पोलिसांच्या या संवेदनशील आणि संयमी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, “ऑपरेशन शोध” मोहीम यशस्वी ठरली आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!