Ads

कालीका माता मंदिर चोरीचा उलगडा! ७.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त;

By Nilesh Sir

March 11, 2026 1:07 pm

Ads

अकोट शहरातील कालीका माता मंदिरात झालेल्या चोरीचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि अकोट शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली असून ७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी अकोट शहरातील बारगण परिसरातील कालीका माता मंदिरातून अज्ञात चोरट्याने देवीच्या मूर्तीवरील दागिने तसेच दानपेटीतील रोकड चोरून नेली होती. या चोरीमध्ये सुमारे ४८ ग्रॅम सोने, ७५० ग्रॅम चांदी आणि दानपेटीतील १५ हजार रुपये असा एकूण ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.

या प्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान अमोल करशीराम तेलगोटे (वय ३९, रा. रिधोरा, ता. बाळापूर, जि. अकोला) हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक छत्तीसगडमधील रायपूर येथेही रवाना करण्यात आले होते. दरम्यान तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला अमरावतीजवळ ताब्यात घेण्यात आले.

पोलीस चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची लगड, चांदीचे बिस्किटे, चांदीचे कडे, मोबाईल फोन, हायड्रोलिक कटर, दागिने वितळविण्याचे साहित्य तसेच एक मोटरसायकल असा एकूण ७,२१,०६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी चोरी करताना स्वतःचा मोबाईल बंद ठेवत असे आणि ओळख लपवण्यासाठी दागिने वितळवून त्यांना वेगळा आकार देत असे. यासाठी लागणारे सर्व साहित्यही त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणात पुढील तपास सुरू असून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!