Ads

बातमी लागताच महसूल विभाग जागा! चोहोट्टा बाजारात वीट भट्ट्यांवर धडक कारवाई

By Nilesh Sir

March 10, 2026 12:45 pm

Ads

अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात बिनपरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांकडे अनेक दिवसांपासून महसूल विभागाने डोळेझाक केल्याचे चित्र समोर आले होते. मात्र या प्रकरणाची बातमी ANN Akola News Network वर प्रसिद्ध होताच प्रशासन अचानक ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले.

दि. ९ मार्च २०२६ रोजी तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत वीट भट्ट्यांची तपासणी व पंचनामा केला. अनेक दिवसांपासून महामार्गालगत सुरू असलेल्या या वीट पजावांमुळे वाहनधारकांना त्रास होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. तरीही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नव्हते.

तपासणीदरम्यान संबंधित वीट भट्टी पजावाधारकांना ३१ मार्च २०२६ पूर्वी शासनाकडे रॉयल्टी भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत रॉयल्टी भरली नाही तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून मालमत्तेवर बोजा चढविण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी दिला.

दरम्यान, अनेक दिवस बिनधास्तपणे सुरू असलेल्या या वीट भट्ट्यांकडे महसूल विभागाने आतापर्यंत का दुर्लक्ष केले, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने केवळ पंचनामा करून थांबू नये, तर बिनपरवाना सुरू असलेल्या वीट भट्ट्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!