Ads

अकोट-हिवरखेड मार्गावर एसटी बसचा थरारक अपघात; पाइपलाईनला धडक, प्रवाशांचा जीव थोडक्यात बचाव

By Nilesh Sir

March 8, 2026 12:15 pm

Ads

अकोट तालुक्यातील अकोट-हिवरखेड मार्गावर खंडाळा आणि चितलवाडी फाट्यादरम्यान एसटी बसचा थरारक अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भरधाव वेगात असलेली बस अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उतरली आणि बाजूला असलेल्या पाणीपुरवठा पाइपलाईनला जोरदार धडक दिली.

या घटनेमुळे काही क्षण परिसरात मोठी खळबळ उडाली. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून अनेक प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला असल्याची माहिती मिळत आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यास मदत केली. या घटनेमुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात नेमका कशामुळे घडला, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अकोट-हिवरखेड मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment