Ads

--

अकोल्यात वर्षा मीना यांची सर्जिकल स्ट्राईक; २५०+ सिलेंडर जप्त, अकोटमध्ये घरगुती गॅस माफियांचे अजूनही धुमाकूळ?

By Nilesh Sir

March 2, 2026 11:57 am

Ads

अकोला शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा प्रकार अकोला न्यूज नेटवर्क ने बातमी प्रकाशित करताच समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत तब्बल २५० हून अधिक घरगुती एलपीजी सिलेंडर जप्त केले आहेत. आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून संबंधित व्यावसायिकांवर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हॉटेल, ढाबे, चौपाट्या, हातगाड्या आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये घरगुती सिलेंडरचा सर्रास वापर होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. घरगुती सिलेंडर अनुदानित दरात मिळत असल्यामुळे त्याचा व्यावसायिक वापर केल्यास शासनाला मोठा महसुली तोटा सहन करावा लागतो. या प्रकारामुळे कमर्शियल सिलेंडरच्या विक्रीवरही परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मात्र अकोट तालुक्यातील परिस्थिती वेगळी असल्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा उघडपणे व्यावसायिक वापर सुरू असल्याचे दिसत असताना पुरवठा विभागाकडून ठोस कारवाई झाल्याचे चित्र दिसत नाही. त्यामुळे अकोट पुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारवाई होणार की संबंधितांना अभय दिले जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या गैरप्रकाराचा सर्वात मोठा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घरगुती सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्यास गरीब कुटुंबांना टंचाईचा सामना करावा लागू शकतो. अनुदानित गॅसचा काळाबाजार होत असल्यास त्यामागे कोणती साखळी कार्यरत आहे, हा देखील गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रशासनाने अकोला शहरात कारवाईचा धडाका दाखवला असला, तरी अकोटमध्येही अशीच कठोर मोहीम राबवली जाणार का, याबाबत स्पष्टता अपेक्षित आहे. शासनाच्या महसुलाचे संरक्षण, गरीब ग्राहकांचे हक्क आणि गॅस वितरणातील पारदर्शकता यासाठी सातत्याने तपास आणि कठोर कारवाई आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

या प्रकरणात पुढे कोणावर गुन्हे दाखल होतात, किती जणांवर दंडात्मक कारवाई होते आणि अकोट पुरवठा विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment