Ads

बाळापुर तहसिल कार्यालयातील शासकीय स्टॅम्प विक्रेता ५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

By Nilesh Sir

February 28, 2026 12:59 pm

Ads

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तहसिल कार्यालयात शासकीय स्टॅम्प विक्रेता ५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकला आहे. श्री. श्याम वसंत देशपांडे (वय ५५), व्यवसाय शासकीय स्टॅम्प विक्रेता, तहसिल कार्यालय बाळापुर, रा. गणेश मंदिरजवळ, जुने शहर किल्ला विभाग, बाळापुर, यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदाराने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला येथे तक्रार दाखल केली. शेतीच्या कामासाठी ५०० रुपयांचे ४ आणि १०० रुपयांचे १० स्टॅम्प खरेदी करावयाचे असल्याने आरोपीकडे संपर्क साधला असता, शासनाने निश्चित केलेल्या ३००० रुपयांच्या अधिकृत शुल्काव्यतिरिक्त ६०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

२७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १४.२३ ते १५.०२ या वेळेत तहसिल कार्यालय बाळापुर येथे पडताळणी व सापळा कारवाई करण्यात आली. तडजोडीनंतर आरोपीने पंचासमक्ष ३५०० रुपये स्वीकारले, त्यापैकी ५०० रुपये लाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने पार पाडली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ अॅन्टी करप्शन ब्युरो, अकोला येथे संपर्क साधावा.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!