Ads

पातूरमध्ये शौर्य दिन व शिवजयंतीनिमित्त भव्य बुद्ध-भिम गीतांचा जागर कार्यक्रम; गायक संतोष जोंधळे यांची विशेष उपस्थिती

By Nilesh Sir

February 9, 2026 5:10 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क पातूर प्रतिनिधी : स्वप्निल सुरवाडे
भिमा कोरेगाव शौर्य दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पातूर शहरात भव्य प्रबोधनात्मक बुद्ध-भिम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बु. गोवर्धनजी पोहरे बहुउद्देशीय शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ, पातूर यांच्या वतीने हा संयुक्त सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येत आहे.


निर्भयभाऊ पोहरे मित्रपरिवार, पातूर यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक व मराठी इंडियन आयडॉल-5 फेम संतोष जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या सादरीकरणातून बुद्ध-भिम विचारधारेवर आधारित गीतांची प्रबोधनात्मक मैफल रंगणार असून, तरुणाईसह नागरिकांमध्ये सामाजिक जागृतीचा संदेश दिला जाणार आहे.


हा भव्य कार्यक्रम शनिवार, दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता नगर परिषद खेळाचे मैदान, पातूर येथे पार पडणार आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निर्भय पोहरे, स्वप्निल सुरवाडे, प्रवीण पोहरे, मंगेश गवई, निहार घुगे, धीरज खंडारे, रवी उपर्वट, विकास सरदार तसेच निर्भयभाऊ पोहरे मित्रपरिवाराचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!