Ads

-

ऑटोकॉनमध्ये लाखोंचा घोटाळा; महिंद्रा डिलरशिपच्या वाशिम शाखेत मॅनेजरसह ६ कर्मचाऱ्यांचा अपहार उघड, सर्व आरोपी अटकेत

By Nilesh Sir

February 9, 2026 7:04 am

Ads

नामांकित महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा ऑटोमोबाईल डिलरशिप गद्रे ऑटोकॉन प्रा. लि. मध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक भंडाफोड झाला असून, कंपनीच्या विश्वासाला तडा देत कर्मचाऱ्यांनीच लाखोंची अफरातफर केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाशिम शाखेतील मॅनेजरसह सहा कर्मचाऱ्यांनी संगनमताने तब्बल ५ लाख ६४ हजार ८९९ रुपये अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल सुहास गद्रे यांच्या पत्नीने ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर हा प्रकार अधिकृतपणे उघड झाला. तक्रारीनुसार, शाखा व्यवस्थापक पंकज रामकृष्ण सरदार (४६) याच्यासह अतुल अबचार, राहुल लांडगे, पियुष चौधरी, विजय कंकाळ आणि मिनाक्षी चौरपगार-हिवराळे यांनी ग्राहकांकडून जमा झालेली रोख रक्कम कंपनीच्या अधिकृत बँक खात्यात न भरता ती स्वतःच्या अथवा खाजगी खात्यांत वळवली. हा गैरप्रकार दीर्घकाळ सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या घोटाळ्याचा पर्दाफाश १९ जानेवारी २०२६ रोजी झाला. शिवणी येथील मुख्य कार्यालयात वाशिम शाखेच्या डेली कॅश शीटची तपासणी करताना मोठी आर्थिक तफावत आढळली. सुरुवातीला लेखा त्रुटीचा संशय व्यक्त झाला; मात्र अंतर्गत ऑडिटमध्ये ५ लाख २९ हजार ८९९ रुपयांची अफरातफर स्पष्ट झाली.

प्रकरण अधिक गंभीर बनले ते कंपनीकडून देण्यात आलेल्या सुमारे ३५ हजार रुपये किमतीच्या लॅपटॉप व सिमकार्ड प्रकरणामुळे. मॅनेजर पंकज सरदार याने ही साधने परत न केल्याचे समोर आले असून २० जानेवारीपासून तो कोणतीही पूर्वसूचना न देता बेपत्ता असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. संबंधित सिमकार्डचा गैरवापर झाला असण्याची शक्यता तपासली जात आहे.

एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली असून आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड, बँक खात्यांची पडताळणी तसेच डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. या घोटाळ्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

या घटनेमुळे ऑटोमोबाईल व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कंपन्यांमधील अंतर्गत आर्थिक नियंत्रण व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक दयाराम राठोड करीत असून, आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment