Ads

--

भरधाव कार रस्त्याखाली कोसळली; उमरी येथे भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर

By Nilesh Sir

February 6, 2026 7:02 am

Ads

मुर्तीजापूरकडून कारंजा लाडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा ताबा सुटल्याने वाहन थेट रस्त्याखाली कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना आज सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास उमरी येथे घडली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच येथील आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर जखमींना प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार यशवंत राठोड (वय ३१), अक्षय रोकडे (वय २७) आणि ओम मुंदे (वय १९) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, या भीषण अपघातात रोहित रिक (वय २५) आणि संकेत मेश्राम (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील सर्व प्रवासी हे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता आणि तांत्रिक बिघाड होता का, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांकडून वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!