Ads

ऑपरेशन प्रहारचा मोठा स्ट्राईक! अकोल्यात 25 गोवंश वाचवले, 6.15 लाखांचा मुद्देमाल जप्त

By Nilesh Sir

February 4, 2026 7:54 am

Ads

अकोला जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गोवंश कत्तलीचा गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे.

खात्रीलायक गुप्त माहितीच्या आधारे API विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विष्णु बोडखे, माजिद खान पठाण व पथकाने पोळा चौक परिसरात पेट्रोलिंगदरम्यान दहीहांडा वेस, खिडकी पुरा येथे छापा टाकला. या छाप्यात 25 गोवंश जातीची जनावरे अत्यंत दयनीय, जखमी व अशक्त अवस्थेत आढळून आली. जनावरांना पाणी व चाऱ्याची कोणतीही व्यवस्था नव्हती आणि ती कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

जप्त जनावरांची अंदाजे किंमत 6 लाख 15 हजार रुपये इतकी असून पंचनामा करून त्यांना आदर्श गोसेवा केंद्र, म्हैसपूर येथे उपचार व देखरेखीकरिता सुपूर्द करण्यात आले आहे.

या प्रकरणी शेख सद्दाम शेख मेहबुब व मोबिन कुरेशी मोहसीन कुरेशी हे आरोपी फरार असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1995, प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध कायदा 1960 आणि भारतीय न्याय संहिता कलम 329 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोल्यातील गुन्हेगारीविरोधातील कारवाईत ऑपरेशन प्रहार पुन्हा एकदा प्रभावी ठरत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!