Ads

---

13 उमेदवार, एक खुर्ची महापौर खुर्चीवर महिला बसणार! पण कोण?

By Nilesh Sir

January 22, 2026 2:39 pm

Ads

अकोला महानगरपालिकेत यंदा महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होताना दिसत असून भाजपकडे तब्बल १३ ओबीसी महिला इच्छुक उमेदवारांची फौज तयार झाली आहे. त्यामुळे महापौरपदासाठी पक्षांतर्गत स्पर्धाही तितकीच तीव्र झाली आहे.

भाजपकडून वैशाली शेळके, पल्लवी मोरे, योगिता पावसाळे, मंजुषा शेळके, शिल्पाताई वरोकार, रश्मी अवचार, निकिता देशमुख, सोनाली अंधारे, शारदा खेडकर, नीतू जगताप, माधुरी शिरसागर, प्राची काकड आणि कल्पना गोटफोडे ही नावे चर्चेत आहेत.

दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीकडून जयश्री बहादुरकर, काँग्रेसकडून निखत शाहीन अफसर कुरेशी, जैनब बी शेख इब्राहीम, अरशीया परविन मोहम्मद शारीक, राष्ट्रवादी शरद पवार गटकडून पूजा गावंडे, तर उद्धव ठाकरे गटकडून सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे या उमेदवार रिंगणात आहेत.

📊 सत्तासमीकरण काय सांगते?

८० सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी ४१ नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपकडे सर्वाधिक ३८ जागा असून अजून तीन नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेसकडे २१, उद्धव ठाकरे गटाकडे ६, वंचितकडे ५, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे ३, एमआयएमकडे ३, तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे प्रत्येकी १ जागा आहे. याशिवाय १ अपक्ष आणि १ महानगर विकास आघाडीचा नगरसेवक असल्याने सत्ता स्थापनेचा खेळ आणखी रंगतदार झाला आहे.

🔍 पुढील महापौर कोण?

ओबीसी महिला आरक्षणामुळे महापौरपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण अकोल्याचे लक्ष लागले आहे. राजकीय हालचालींना वेग आला असून उद्या अकोल्याचा पुढील महापौर कोण होणार, हे स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अकोल्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न गाजतोय — महापौर खुर्चीवर बसणार कोण?

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!