Ads

---

मतदानाच्या दिवशी जळगाव हादरले! हवेत गोळीबार,

By Nilesh Sir

January 15, 2026 3:58 pm

Ads

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू असतानाच शहरातील पिंप्राळा भागातून एक धक्कादायक घटना समोर आली. पिंप्राळा परिसरातील आनंद मंगल नगर येथे दोन तरुणांमध्ये जुन्या वादातून भांडण झाले आणि त्याच वादाचे रूपांतर हवेत गोळीबारात झाले. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित दोन व्यक्तींमध्ये आधीपासून वैयक्तिक वाद सुरू होता. मतदानाच्या दिवशी पुन्हा वाद उफाळून आला आणि रागाच्या भरात एकाने हवेत गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात नागरिकांची धावपळ उडाली, तर अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले.

घटनेची माहिती मिळताच डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

मतदानाच्या दिवशीच ही घटना घडल्याने शहरात चर्चेला उधाण आले होते. मात्र पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, हा प्रकार पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडला असून त्याचा महापालिका निवडणूक किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संबंध नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सध्या पिंप्राळा परिसरात परिस्थिती नियंत्रणात असून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. पोलिस प्रशासनाकडून घटनेचा सखोल तपास केला जात असून कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment