Ads

---

मतदार ओळखपत्र नसेल तरी मतदान शक्य; महापालिका निवडणुकीसाठी आयोगाने दिला मोठा दिलासा

By Nilesh Sir

January 14, 2026 1:33 pm

Ads

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र (EPIC कार्ड) नसले, तरीही मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी पर्यायी ओळखीचे १२ वैध पुरावे निश्चित केले असून, त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे.

१५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदाराने मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटवणे आवश्यक आहे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र हा प्राथमिक पुरावा असला, तरी ते उपलब्ध नसल्यामुळे कोणाचाही मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार ओळखपत्र नसलेल्या नागरिकांनी खालीलपैकी कोणताही एक वैध छायाचित्र असलेला पुरावा सादर केल्यास मतदान करता येईल.

यामध्ये पासपोर्ट, आधार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, केंद्र किंवा राज्य शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिलेले छायाचित्रयुक्त कर्मचारी ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँक किंवा टपाल खात्याचे फोटो असलेले पासबुक, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला दिव्यांग दाखला, मनरेगा जॉब कार्ड, निवृत्त कर्मचाऱ्यांचे किंवा त्यांच्या विधवा व अवलंबितांचे छायाचित्रयुक्त निवृत्तीवेतन कागदपत्र, लोकसभा–विधानसभा सचिवालयाचे अधिकृत ओळखपत्र, स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो ओळखपत्र आणि केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे कार्ड यांचा समावेश आहे.

लोकशाही प्रक्रियेत मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे कोणताही पात्र मतदार ओळखपत्राच्या अभावामुळे मतदानापासून वंचित राहू नये, हा आयोगाचा उद्देश आहे. नागरिकांनी उपलब्ध ओळखपत्रासह मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Article

एकतर्फी प्रेमाचा विकृत सूड? निष्पाप चिमुकल्याची निर्घृण हत्या;

जिवंतपणी कुणी नव्हतं सोबत… मृत्यूनंतर मिळाला माणुसकीचा खांदा! अकोटमध्ये अनोळखी मृतदेहांना सन्मानाने निरोप देणारे पांडुरंग तायडे

जीवाशी खेळ? प्रसूतीनंतर महिलेच्या पोटात आढळला डॉक्टरांचा ग्लोव्ह

चिचखेड फाट्यावर भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, चालक गंभीर जखमी

जन्माआधीच मृत्यूची नोंद!प्रसूती वेदनांपासून मृत्यूच्या वेदनेपर्यंत; एका आईची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

LCB अडचणीत; बुलढाण्यात पोलिसांचा मोठा घोळ? जिच्या हत्येप्रकरणी वडील-भाऊ जेलमध्ये, तीच तरुणी निघाली जिवंत, LCB च्या तपासावर गंभीर प्रश्न

No comments to show.

Leave a Comment