Ads

--

सांगलीत धक्कादायक दरोडा! आटपाडीतील जिल्हा बँकेत २२ लॉकर फोडले; ९.३० लाखांचे दागिने लंपास

By Nilesh Sir

January 9, 2026 2:39 pm

Ads

सांगली जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली असून आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत अज्ञात दरोडेखोरांनी मोठा डल्ला मारला आहे. चोरट्यांनी तब्बल २२ लॉकर फोडून सुमारे ९ लाख ३० हजार रुपयांचे सोन्या–चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झरे बसस्थानक परिसरातील तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीत जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा भाड्याने सुरू आहे. ६ जानेवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या पूर्वेकडील बाजूची खिडकी धारदार शस्त्राच्या साहाय्याने कापून आत प्रवेश केला. त्यानंतर अत्यंत सराईतपणे स्ट्राँग रूममधील २२ लॉकर तोडून ग्राहकांचे मौल्यवान दागिने आणि रोकड चोरून नेली.

ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेचे कर्मचारी कामावर आल्यानंतर उघडकीस आली. प्राथमिक तपासात दरोडेखोरांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेत प्रवेश करताच त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले, तसेच डीव्हीआर (DVR) सोबत नेल्याने कोणतेही दृश्य पुरावे उपलब्ध राहिले नाहीत. शिवाय हाताचे ठसे उमटू नयेत म्हणून हँडग्लोव्हजचा वापर करण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे.

घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि संभाव्य मार्गांचा तपास सुरू आहे. मात्र कोणताही ठोस पुरावा मागे न राहिल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!