WhatsApp


Pink Rickshaw राज्यातील महिलांना मिळणार रोजगार शहरात सुरु होणार “पिंक रिक्षा” काय आहे वेगळेपण?

Share

अकोला न्युज नेटवर्क :- Pink Rickshaw : राज्यातील महत्त्वाच्या शहरांत ‘पिंक रिक्षा’ ही योजना लवकरच सुरू करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी दिली. काय आहे ही योजना? कोणाला होणार फायदा?

महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी राज्यातील महत्त्वाच्या शहरांत ‘पिंक रिक्षा’ ही योजना लवकरच सुरू करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी जाहीर केले.

महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलाविली होती. या बैठकीत त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या की, ही योजना परिपूर्ण करावी. यामध्ये लाभार्थी निवड, ई-रिक्षाला प्राधान्य देणे, बँका निवड तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तपासून घ्याव्यात.

‘या’ शहरात पिंक रिक्षा योजना होणार सुरू Pink Rickshaw

महिला आणि बालकल्याण विभागासाठी मंगळवारी आदिती तटकरे मंत्रालयात आल्या असता, त्यांनी महिला रोजगार आणि महिला प्रवासासाठी सुरक्षित सेवा मिळाव्यात म्हणून मंत्रालयात आदिती तटकरेंनी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी योजनेबाबत भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की ही योजना परिपूर्ण करावी या योजनेत लाभार्थी निवड, ई-रिक्षाला प्राधान्य, बॅंका निवड तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तपासून घ्याव्यात. प्रायोगिक तत्त्वांवर मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि ठाणे या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचा विचार आहे.

महत्त्वाचं म्हणजे देशात बलात्काराच्या अनेक घटना घडत आहेत. या पिंक रिक्षा केवळ महिलांसाठी असणार असून याचा फायदा आता महिलांना घेता येऊ शकतो. यामुळे महिलांचा त्रास कमी होणार आहे. या योजनेचं आणि निर्णयाचं सर्वीकडे कौतुक होतंय.

Leave a Comment

error: Content is protected !!