Ads

---

नरनाळा महोत्सव पुन्हा सज्ज! 15 ते 17 फेब्रुवारीला भव्य आयोजन, कैलास खेर लाईव्ह कॉन्सर्टसह जंगल सफारी आणि साहसी खेळांचे आकर्षण

By Nilesh Sir

February 2, 2026 9:06 pm

Ads

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे 30 जानेवारी रोजी रद्द करण्यात आलेला नरनाळा महोत्सव आता नव्या तारखांसह पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा महोत्सव 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून सातपुड्यात वसलेल्या मेळघाट परिसराचे वनवैभव, आदिवासी संस्कृती आणि पर्यटन क्षमता नागरिकांसमोर सादर केली जाणार आहे. महोत्सवात जंगल सफारी, साहसी खेळ, नौकाविहार, पक्षीनिरीक्षण, गडभ्रमंती, छायाचित्र प्रदर्शन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रत्येक दिवशी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून ‘चला हवा येऊ द्या’, ‘शिवशंभू गर्जना’ यांसह प्रसिद्ध गायक कैलास खेर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

पोपटखेड धरण परिसरात झॉर्बिंग वॉटर बॉल, बोटिंग, व्हॅली क्रॉसिंग, ट्रेकिंग आणि रॅपलिंगसारख्या साहसी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

नरनाळा किल्ल्याच्या ऐतिहासिक वैभवाला उजाळा देत जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!