WhatsApp


Tulsi Vivah Puja List : तुळशी विवाहसाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी पाहा

Share

Tulsi Vivah Puja List हिंदू दिनदर्शिकेनुसार, तुळशी विवाह कार्तिक शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी आयोजित केला जातो. म्हणून काही लोक दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला तुळशी विवाहाचे आयोजन करतात.

(‘ANNन्युज’ चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

akola news WhatsApp number
akola news WhatsApp number

जे एकादशीच्या दिवशी तुळशीविवाहाचे आयोजन करतात ते यावर्षी 23 नोव्हेंबर रोजी आयोजित करतील, तर द्वादशीच्या दिवशी तुळशीविवाहाचे आयोजन 24 नोव्हेंबर टोजी करतील. तुळशी विवाह (Wedding) साहित्याची यादी येथे जाणून घ्या…

तुळशी विवाहाची आख्यायिका : Tulsi Vivah Puja List
जालंदर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता. वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा पराभव शक्य नाही, हे देवतांना कळून चुकले. म्हणून भगवान महाविष्णूंनी जालंदराच्या अनुपस्थितीत त्याचेच रूप धारण करून, त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्व हरण केले. सती वृंदा हिच पुढे तुळशीरूपाने प्रगट झाली, तेव्हा तिचे महात्म्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वत: तिच्याशी लग्न केले. त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात.

तुळशीचे धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व : Tulsi Vivah Puja List
तुळस ही बहुगुणी व प्रभावी औषध आहे. त्यामुळे शास्त्राने देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे. एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे, हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले जाते. अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे. श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तो अन्य कशाने होत नाही. तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. तुळशीपूजेशिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैवुंâठात जातो, अशी श्रद्धा आहे. म्हणून मृतकाच्या मुखात गंगाजळाप्रमाणे तुलसीपत्रही ठेवण्यात येते. तुळशी दुषित वायू शोषून घेत प्राणवायू सोडते, हे शास्त्रानेही सिद्ध झाले आहे. म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन बांधले जाते. तसेच शहरी भागात खिडकीतल्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते. दारात तुळशी असणे, हे शुभलक्षण मानले जाते.

तुळशी विवाहाची पद्धत : Tulsi Vivah Puja List

कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याचीप्रथा असली, तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात. काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावून ते वाढवतात व वरील दिवशी तिचे लग्न लावतात. यंदा २३-२७ नोव्हेंबर या कालावधीत तुळशी विवाह करायचा आहे.

विवाहदिनी तुळशीवृंदावन स्वच्छ व सुशोभित करतात. त्यापुढे रांगोळी काढून बाळकृष्ण व तुळशी यांची एकत्र षोडशोपचार पूजा करतात. फराळ, मिठाईचा नैवेद्य दाखवतात. सनई-चौघडे लावतात. फटाके फोडतात. उपस्थितांना अक्षता वाटून रितसर लग्नविधी करून गुरुजी मंगलाष्टक म्हणतात. अशा थाटात विवाह लावला जातो. सर्वांना प्रसाद, फराळ किंवा खाऊ वाटप केला जातो. ज्या घरात तुळशीचा विवाह होतो, त्या घरातील उपवर मुलामुलींचा विवाह सुकर होतो, अशी भाविकांची श्रद्धा असते. एकादशीला अनेकांचा उपवास असल्याने द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह लावण्याची प्रथा रूढ झाली आहे.

तुळशी विवाहसाठी साहित्य Tulsi Vivah Puja List

  • फळ (Fruit)
  • हळद कुंड
  • बताशा
  • दिवे
  • तुळशीजी
  • फूलं
  • भगवान विष्णूचे चित्र
  • ऊस
  • गणेशाची मूर्ती
  • एक सुंदर रुमाल
  • मेकअप अॅक्सेसरीज
  • नैवद्य
  • हळद
  • धूप
  • लाल चुनरी
  • कुंकू
  • तीळ
  • कापूर
  • तुपाचा दिवा
  • आवळा
  • हरभरा भाजी

वधू-वरांनी दिल्या जाणाऱ्या अत्यावश्यक वस्तू

शुभ मुहूर्त –

बहुतेक लोक (People) द्वादशीच्या दिवशी तुळशी विवाह करतात. यावर्षी, कार्तिक शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी 23 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 09:01 पासून सुरू होईल आणि 24 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 07:06 पर्यंत सुरु राहील. तुलसी विवाहाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील असेल. अभिजित मुहूर्त सकाळी 11:46 ते 12:29 पर्यंत असेल, तर विजय मुहूर्त दुपारी 01:53 ते 02:36 पर्यंत असेल.

तुळशी विवाह दरम्यान या मंत्राचा जप करा

तुळशी आणि शाळीग्राम मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी तुळशीला स्पर्श करताना या मंत्राचा जप करावा.

Leave a Comment

error: Content is protected !!