WhatsApp


मनातील प्रश्नाला WhatsApp AI वर उत्तर! या युझर्ससाठी झाले सुरु AI फीचर, चॅटिंगचा दुप्पट आनंद

Share

WhatsApp AI तुमच्या प्रश्नांना धडाधड उत्तरे मिळतील. तर चॅटिंगसाठी पण हे फीचर जबरदस्त ठरेल. चॅटिंग करताना अनेकदा की-बोर्ड आणि टायपिंगची काहींना समस्या येते. काहींना टायपिंगचा कंटाळा येतो. मग व्हाईस मॅसेजिंगचा खेळ खेळावा लागतो. त्यात वेळ जातो. आता AI फीचरमुळे WhatsApp हाताळणे सोपे होणार आहे. सध्या हे फीचर बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. हे फीचर अमेरिकेतील वापरकर्त्यांपुरते मर्यादीत आहे. पण लवकरच हे फीचर जगभरातील युझर्ससाठी उपलब्ध होईल.

WhatsApp AI असिस्टंट बीटामध्ये

akola news WhatsApp number
akola news WhatsApp number
  • AI असिस्टंट हे स्नॅपचॅटच्या ‘माय एआय’ सारखे आहे. हे तुमच्यासोबत बॉटच्या मदतीने बोलते. WhatsApp वर हे फीचर पण त्याचप्रमाणे काम करेल. हे फीचर तुम्हाला ग्रुप चॅटसाठी उपयोगी पडले. तसेच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पण मदतीला येईल. या फीचरची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरु होती. सध्या अमेरिकेत त्याचा प्रयोग सुरु आहे.
  • WABetainfo च्या माहितीनुसार, हे नवीन फीचर अँड्रॉईड 2.23.24.26 अपडेटसाठी WhatsApp बीटासह उपलब्ध असेल. हे नवीन फीचर वापरकर्त्यांना Google Play Store वरुन डाऊनलोड करता येईल.
  • WhatsApp ने ‘नवीन चॅट’ बटणसाठी सर्वात वरील बाजूला एक शॉर्टकट बटण दिले आहे. त्यामुळे एक निळे गुलाबी वर्तूळ असेल जे एआय असिस्टंटला दाखवेल. यावर टॅप करताच एआई असिस्टटसाठी चॅट ओपन होईल.
  • त्यामुळे कुठे पण न शोधता, तुम्ही AI चॅट सहज मिळवाल आणि त्याचा वापर करु शकाल. याचा वापर करुन चॅटिंग करणे सोपे होईल. तुमच्या मनातील प्रश्नांची झटपट उत्तरे मिळतील.
  • हे फीचर सध्या बीटा युझर्ससाठी उपलब्ध आहे. सध्या प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर हे फीचर उपलब्ध नाही. जर तुमच्याकडे Whatsapp Beta असेल तर तुम्ही हे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करु शकता. तुम्ही व्हॉट्सअपवर जाऊन लेटेस्ट फीचर तपासू शकता. वापरकर्त्यांना हे फीचर लवकरच उपलब्ध होईल.
aso sarafa

Leave a Comment

error: Content is protected !!