Ads

पातूरमध्ये १४ वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप; तिघांविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

By Nilesh Sir

November 26, 2026 1:50 pm

Ads

ANN News Network | प्रतिनिधी : स्वप्निल सुरवाडे दि. २६ नोव्हेंबर २०२६ पातूर : पातूर शहरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पातूर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अर्थात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १४ वर्षे २ महिन्यांची आहे. यातील मुख्य आरोपी जहीर खान मुकद्दर खान पठाण (वय १९, रा. काटा, ता. जि. वाशिम) याने स्नॅपचॅट या सोशल मीडिया माध्यमातून मुलीशी ओळख वाढविल्याचा आरोप आहे. त्यानंतर अन्य दोन आरोपी वैभव सुनील चव्हाण आणि साहील खान समशेर खान पठाण यांच्या मदतीने संगनमत करून २३ सप्टेंबर २०२६ रोजी मुलीला फूस लावून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर मुलीला पातूर शहरातील एका लॉजवर नेण्यात आले. दोघे आरोपी लॉजच्या बाहेर थांबले असताना मुख्य आरोपीने मुलीला खोलीत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून १७ मिनिटांनी फिर्यादीच्या जबानीवरून पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय वानखेडे करीत आहेत.

Related Article

अकोला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सुटणार? संदीप पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा!

कुटासा येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर; ३०० रुग्णांची तपासणी, ७० जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

अकोल्यात दुष्काळाची दाहकता एसटीपीच्या ९० टँकरवर पाच हजार बांधकामांचा भार; भूजल उपशावर नियंत्रण कुठे? बांधकामांतील बोअरवेल सील करण्याची मागणी

खदान पोलिसांना न्यायालयाची चपराक! सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन भोवले

अकोल्यात पाण्याचा अपव्यय करणाऱ्या हॉटेलला ५ हजारांचा दंड; मनपाची कारवाई सुरू

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान; अकोल्यात १३ केंद्रांवर तयारी पूर्ण

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!