Ads

धारगड यात्रेला आजपासून सुरुवात! भाविकांचा ओघ वाढला; वन विभागासह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By Nilesh Sir

August 30, 2026 10:35 am

Ads

सातपुड्याच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री क्षेत्र धारगड महादेव यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून मोठ्या संख्येने भाविक धारगडकडे येण्यास सुरुवात झाली आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वन विभाग प्रशासन तसेच अमरावती ग्रामीण पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

धारगड यात्रेसाठी पोपटखेड नाक्यावरून प्रवेश सुरू करण्यात आला असून, भाविकांची सुरक्षितता आणि वनक्षेत्रातील शिस्त राखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

खटकाली गेटवर वाहनांची कसून तपासणी

धारगडच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांची खटकाली गेटवर कसून तपासणी करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्लास्टिक बॉटलवर बंदी घालण्यात आली आहे. भाविकांकडील प्लास्टिक बॉटलवर १० रुपयांचे स्टिकर लावण्यात येत आहे.

यात्रा आटोपून परतताना भाविकांनी बॉटलवरील स्टिकर दाखवल्यानंतर १० रुपये परत दिले जात आहेत. प्लास्टिकमुळे सातपुड्याच्या पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

नदीपात्रात प्रवेशास निषेध

दरम्यान, नदीपात्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि भाविकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी नदीपात्रात प्रवेश करण्यास निषेध करण्यात आला आहे. प्रशासनाकडून भाविकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सातपुड्याच्या निसर्गरम्य कुशीत सुरू झालेल्या धारगड महादेव यात्रेसाठी भाविकांचा ओघ वाढत असताना वन विभाग आणि अमरावती ग्रामीण पोलिस प्रशासनाकडून सुरक्षेसह पर्यावरण संवर्धनावरही विशेष लक्ष दिले जात आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!