Ads

प्रेमाचा करुण अंत! विहिरीत उडी घेतलेल्या प्रियकराचा मृत्यू; तरुणीनेही केले विषप्राशन

By Nilesh Sir

August 28, 2026 10:13 am

Ads

मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात गुरुवारी (दि. २७) सकाळी १० वाजताच्या सुमारास प्रेमीयुगुलाने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत २५ वर्षीय अनिश शरद चव्हाण याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर स्थानिकांनी तरुणीला विहिरीतून बाहेर काढून तिचे प्राण वाचविले.

प्राथमिक माहितीनुसार, अनिश आणि संबंधित तरुणी गुरुवारी सकाळी गावाबाहेर भेटले होते. त्यानंतर दोघांनी एका शेतातील विहिरीत उडी घेतली. ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ धाव घेत तरुणीला बाहेर काढले. मात्र अनिशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

तरुणीने घरी जाऊन केले विषप्राशन

विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तरुणी घरी गेली. त्यानंतर तिने विषप्राशन केल्याची माहिती समोर आली. तिची प्रकृती बिघडल्याने तिला प्रथम मूर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

अनिशच्या मृत्यूनंतर कुटुंबांमध्ये हाणामारी

दरम्यान, अनिशच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दोन्ही कुटुंबांमध्ये शिवीगाळ आणि हाणामारी झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. घटनेची माहिती मिळताच माना पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकार यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी अकोल्याहून दंगा काबू पथक तैनात करण्यात आले. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे, दीपक महाडिक, धर्मेंद्र जोशी यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला. या घटनेमुळे संबंधित गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!