Ads

खटकाली डोहात काळाचा घाला! अकोटच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू; शहरात हळहळ

By Nilesh Sir

August 24, 2026 6:03 pm

Ads

सोमवार निमित्त सातपुड्याच्या कुशीत फिरण्यासाठी गेलेल्या अकोट येथील दोन विद्यार्थ्यांचा चिखलदरा तालुक्यात येत असलेले खटकाली डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने अकोट शहरात खळबळ उडाली असून, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास अकोट येथील काही विद्यार्थी सातपुड्यात जंगलात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी हे विद्यार्थी चिखलदरा तालुक्यातील खटकाली डोह परिसरात पोहोचले. डोहातील पाण्याचा अंदाज न आल्याने इयत्ता अकरावी मधील कृष्णा झांबरे आणि गिरीधर दाभाडे हे दोन विद्यार्थी पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे.पुढील अपडेट्स लवकरच..!* पण त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा; आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा…!_

घटना लक्षात येताच परिसरात एकच धावपळ उडाली. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एकलव्य आपत्कालीन बचाव पथकाचे पांडुरंग तायडे तसेच संपूर्ण पथक तसेच रुग्णसेवक संजय शळके यांनी तातडीने मदतकार्य केले. बचाव कार्यादरम्यान दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह अकोट ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.पुढील अपडेट्स लवकरच..!* पण त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा; आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा…!_

या घटनेची माहिती अकोटमध्ये पोहोचताच मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. काही वेळापूर्वी आनंदाने फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सातपुड्याच्या निसर्गरम्य परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि युवक फिरण्यासाठी जात असतात. मात्र, डोह, धबधबे आणि जलसाठ्यांमधील पाण्याची खोली तसेच प्रवाहाचा अंदाज येत नसल्याने अशा ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. खटकाली डोहातील या दुर्घटनेनंतर पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुढील अपडेट्स लवकरच..!* पण त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा; आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा…!_

वृत्त लिहीपर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कृष्णा झांबरे आणि गिरीधर दाभाडे या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेबाबत अधिकृत तपशील आणि पुढील माहिती मिळणे बाकी आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!