Ads

हिवरखेड कार्ला फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकी-स्कुटीची समोरासमोर धडक, तिघे गंभीर

By Nilesh Sir

August 19, 2026 7:28 pm

Ads

हिवरखेड रोडवर कार्ला फाट्याजवळ दुचाकी आणि स्कुटीची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींमध्ये सोंडळा येथील संतोष अंधुरकर, तसेच सोनाळा येथील किशोर खडे आणि त्यांची पत्नी यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्ला फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की दुचाकी आणि स्कुटीचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर तिघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. या भीषण अपघातामुळे हिवरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!