Ads

कावडधाऱ्यांच्या गर्दीत पोलिस मित्रांचा ‘माणुसकीचा पहारा’ नदीपात्रातील जीर्ण मूर्ती झाली सुरक्षित!

By Nilesh Sir

August 16, 2026 10:35 pm

Ads

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीपात्रात जल भरण्यासाठी आज रविवारी संध्याकाळ पासून कावडधारी भाविकांची मोठी गर्दी होत असतानाच नदीपात्रात जीर्ण मूर्ती उघड्या अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले. दहीहंडा पोलिस स्टेशनच्या पोलिस मित्रांनी प्रसंगावधान राखत तातडीने मूर्ती बाजूला करून सुरक्षित ठिकाणी ठेवली.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर अकोट, अकोला तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने कावडधारी भाविक गांधीग्राम येथे दाखल होत आहेत. पूर्णा नदीपात्रातून जल घेऊन भाविक महादेवाला अभिषेक करण्यासाठी रवाना होत असताना नदीपात्रात पोलिस मित्रांची नजर फिरत होती.

याचदरम्यान नदीपात्रात एक जीर्ण मूर्ती उघड्या अवस्थेत पडलेली आढळली. भाविकांची मोठी गर्दी असताना मूर्ती अशा अवस्थेत राहिल्यास तिची विटंबना होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस मित्रांनी तात्काळ पुढाकार घेतला. कोणताही विलंब न करता त्यांनी नदीपात्रात उतरून मूर्ती बाजूला काढली आणि सुरक्षित ठिकाणी ठेवली. त्यांच्या या तत्पर आणि संवेदनशील कृतीमुळे धार्मिक भावना जपण्यासोबतच संभाव्य अनुचित प्रकारालाही आळा बसला.

पोलिस मित्रांची ‘नजर’ पडली अन् मूर्ती झाली सुरक्षित!

गांधीग्राम येथे कावडधारी भाविकांची गर्दी असताना सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिस मित्रांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद ठरत आहे. पोलिस बंदोबस्त केवळ गर्दी नियंत्रणापुरता मर्यादित न राहता धार्मिक स्थळे आणि भाविकांच्या भावनांची काळजी घेण्यापर्यंत पोहोचल्याचे या घटनेतून दिसून आले.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

पोलिस मित्रांच्या या कार्याचे गांधीग्राम परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, ‘कर्तव्य बजावताना संवेदनशीलता जपणारे हात’ अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!