ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. मात्र, अकोट तालुक्यातील टाकळी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रज्ञा जगजीवन दामोदर यांच्याविरोधात लाच मागणीच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. 50 हजारांची लाच मागितल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९(१) अंतर्गत सरपंचांना पदासाठी अपात्र घोषित करण्याचा आदेश अमरावतीच्या अपर आयुक्तांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी पारित केला आहे.
या निर्णयामुळे टाकळी खुर्द ग्रामपंचायत परिसरात एकच खळबळ उडाली आहे. थेट जनतेमधून निवडून आलेल्या सरपंचांवर प्रशासकीय पातळीवर झालेली ही कारवाई सध्या अकोट तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

नेमकं प्रकरण काय?
अपर आयुक्त, अमरावती यांच्या समोरील प्रकरण क्रमांक १०४ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला हे अर्जदार, तर टाकळी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रज्ञा जगजीवन दामोदर या गैरअर्जदार होत्या.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.
आदेशातील कागदपत्रांनुसार, चोहोट्टा बाजार येथील योगेश गंगाधर बुंदे यांनी ५ सप्टेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. टाकळी खुर्द गावाच्या शिवारातील गुंठेवारी प्लॉट अकृषक करण्यासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात 50 हजारांची लाच मागितल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता.
तक्रारीनंतर ६ सप्टेंबर २०२४ रोजी दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत एसीबीकडून लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. आदेशातील नोंदीनुसार, सुरुवातीला 50 हजारांची मागणी करण्यात आली आणि तडजोडीनंतर 40 हजारांवर व्यवहार ठरल्याचे नमूद आहे.
सापळा कारवाईत 10 हजारांची रक्कम
यानंतर एसीबीने सापळा रचला. आदेशातील माहितीनुसार, तक्रारदाराला लाचेची रक्कम सरपंचांच्या वडिलांकडे देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने 10 हजारांची अॅडव्हान्स रक्कम सरपंचांचे वडील जगजीवन लहूजी दामोदर यांच्याकडे दिल्याचे नमूद आहे.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!
आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.
या कारवाईनंतर प्रज्ञा जगजीवन दामोदर आणि त्यांचे वडील जगजीवन लहूजी दामोदर यांच्याविरोधात दहिहांडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५३/२०२४ दाखल करण्यात आला. हा गुन्हा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ आणि १२ अंतर्गत दाखल झाल्याचे आदेशात नमूद आहे.
प्रकरण पोहोचले अपर आयुक्तांच्या दालनात
एसीबीच्या कारवाईनंतर प्रकरण केवळ पोलिसांच्या तपासापुरते राहिले नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९(१) अंतर्गत सरपंचांविरोधात प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव सादर केला.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांनी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी चौकशी अहवाल सादर केला. त्यामध्ये तक्रारदाराच्या फिर्यादीवरून सरपंच प्रज्ञा दामोदर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे नमूद करण्यात आले.
त्यानंतर अपर आयुक्त कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. अर्जदार आणि गैरअर्जदार यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी वारंवार संधी देण्यात आली. मात्र आदेशानुसार, दोन्ही पक्षकार सतत अनुपस्थित राहिल्याने उपलब्ध कागदपत्रे, चौकशी अहवाल आणि इतर नोंदींच्या आधारे प्रकरणाचा निर्णय घेण्यात आला.
१० ऑगस्टला मोठा निर्णय
सर्व उपलब्ध कागदपत्रे आणि परिस्थितीचा विचार केल्यानंतर अमरावतीच्या अपर आयुक्तांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी महत्त्वपूर्ण आदेश दिला.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!
आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.
आदेशानुसार, अर्जदाराचा अर्ज मान्य करण्यात आला असून, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९(१) अन्वये प्रज्ञा जगजीवन दामोदर यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल टाकळी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.
थेट जनतेतून निवडलेल्या सरपंचांवर कारवाई
प्रज्ञा जगजीवन दामोदर या टाकळी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून थेट जनतेमधून निवडून आल्या होत्या. ग्रामपंचायतीचा पदावधी ४ जानेवारी २०२३ ते ३ जानेवारी २०२८ असा असल्याचे आदेशात नमूद आहे.मात्र पदावधी पूर्ण होण्यापूर्वीच लाच मागणीच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली आहे.
एका बाजूला जनतेचा विश्वास, दुसऱ्या बाजूला लाच मागणीचा आरोप आणि एसीबीची कारवाई… या संपूर्ण प्रकरणाचा शेवट आता सरपंच पदाच्या अपात्रतेच्या आदेशाने झाला आहे. टाकळी खुर्द ग्रामपंचायतीतील या कारवाईने अकोट तालुक्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!
आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.






Leave a Comment