Ads

वृक्षलागवडीचा पत्ता नाही, वृक्षतोडीला मात्र मोकळे रान! मोहाळा फाटा–आंबोळा मार्गावर प्रशासनाचा अजब कारभार?

By Nilesh Sir

August 9, 2026 10:10 am

Ads

अकोट : पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली दरवर्षी वृक्षलागवडीचे मोठमोठे दावे केले जातात. मात्र अकोट तालुक्यातील मोहाळा फाटा ते आंबोळा–अकोली जहागीर मार्गावर सध्या याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल सुरू असल्याचे चित्र समोर आले असून, प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यंदाच्या पावसाळ्याचा जवळपास अर्धा कालावधी उलटून गेला असतानाही प्रशासनाकडून वृक्षलागवडीचे ठोस काम कुठे दिसून येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!
आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.एकीकडे नवीन झाडे लावण्याचा पत्ता नाही आणि दुसरीकडे उभी असलेली झाडे खुलेआम तोडली जात असल्याचे चित्र असल्याने पर्यावरण संवर्धनाच्या सरकारी दाव्यांची पोलखोल होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

वृक्षलागवड कुठे? आणि वृक्षतोडीवर कारवाई कुठे?

रस्त्याच्या शेजारील वृक्षतोड नेमकी कोणाच्या परवानगीने सुरू आहे? संबंधित झाडे तोडण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का? तसेच या वृक्षतोडीची जबाबदारी नेमकी कोणाची आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

रस्त्यालगतची झाडे सार्वजनिक मालमत्ता, शासकीय जागा किंवा इतर विभागाच्या अखत्यारित येत असल्यास संबंधित विभागाने त्याची गंभीर दखल घेणे अपेक्षित आहे.अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सर्वात आधी स्थानिक बातम्यांसाठी ‘अकोला न्यूज नेटवर्क’च्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा!
आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट थेट आपल्या मोबाईलवर मिळवा. मात्र प्रत्यक्षात वृक्षतोड सुरू असतानाही प्रशासनाचे अधिकारी याकडे कितपत लक्ष देत आहेत, हा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

बांधकाम विभाग की वन विभाग?

मोहाळा फाटा–आंबोळा–अकोली जहागीर मार्गावर सुरू असलेल्या या वृक्षतोडीवर बांधकाम विभाग कारवाई करणार की वन विभाग पुढाकार घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित विभागांनी घटनास्थळी पाहणी करून वृक्षतोडीची वस्तुस्थिती तपासावी आणि अनधिकृत वृक्षतोड असल्यास तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

एकीकडे पर्यावरण वाचवण्याचे आवाहन, वृक्षलागवडीच्या घोषणा; तर दुसरीकडे डोळ्यादेखत वृक्षतोड—हा नेमका प्रशासनाचा पर्यावरण संवर्धनाचा कारभार आहे तरी कसा? असा संतप्त सवाल आता अकोट तालुक्यातून उपस्थित होत आहे.

Related Article

वृक्षलागवडीचा पत्ता नाही, वृक्षतोडीला मात्र मोकळे रान! मोहाळा फाटा–आंबोळा मार्गावर प्रशासनाचा अजब कारभार?

अकोट नगरपरिषदेचा अजब कारभार! आधी मुरूम, दोन दिवसांत काँक्रेट; एकाच खड्ड्यावर दोनदा निधी खर्चाचा सवाल

कुटासातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर कुत्र्यांचा वावर; गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात, पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष?

अकोटमध्ये कावड उत्सवाची जय्यत तयारी; छावा शिवभक्त मंडळाच्या बैठकीत सचिन नागपुरे यांची अध्यक्षपदी निवड!

पोपटखेड धरणाचे गेट उघडले; अकोट तालुक्यातील २९ गावांना सतर्कतेचा इशारा!

चोहोट्टा बाजारात मटका बंद… मग एका ‘लाडक्या’ धंदेवाल्यालाच अभय कुणाचे?; पोलिसांच्या भूमिकेवर संशय

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!