Ads

अकोला जिल्ह्यात अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीचा सुळसुळाट?

By Nilesh Sir

August 4, 2026 4:27 pm

Ads

अकोला | प्रतिनिधी अकोला जिल्ह्यात अवैधरित्या पेट्रोल आणि डिझेल विक्रीचा व्यवसाय वाढत असल्याचा आरोप समोर आला असून, बार्शीटाकळी आणि मूर्तिजापूर तालुक्यातील काही ठिकाणी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून ज्वलनशील पदार्थांची कथित विक्री सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या प्रकारामुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित यंत्रणांनी तातडीने तपास करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपाशी मार्गावरील जिनिंग कारखान्याजवळ तसेच बार्शीटाकळी–महान मार्गावरील महागाव फाट्याजवळील बंद कारखान्याच्या टिनशेडमध्ये अवैध पेट्रोल विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागली काटे परिसरातही मोठ्या प्रमाणात अवैध पेट्रोल-डिझेलची खरेदी-विक्री सुरू असल्याचा दावा केला जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ कोणत्याही सुरक्षित व्यवस्थेशिवाय साठविले जात असल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका कायम आहे. परिसरात आग लागल्यास किंवा स्फोट झाल्यास मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.

यापूर्वी जिल्हा पुरवठा विभागाने पातूर परिसरात अवैध पेट्रोल विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली होती. मात्र त्यानंतरही जिल्ह्यात अशा प्रकारच्या कथित अवैध व्यवसायावर पूर्णपणे आळा बसलेला नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी नियमित तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली असून, संबंधित विभागांनी या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.

या प्रकरणातील आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित पोलीस प्रशासन, जिल्हा पुरवठा विभाग किंवा संबंधित व्यक्तींची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!