Ads

डोक्यावर हेल्मेट नसेल तर खिशाला फटका! अकोट शहर पोलिसांची कडक कारवाई

By Nilesh Sir

August 1, 2026 1:48 pm

Ads

अकोला पोलिस अधीक्षक यांच्या आदेशावरून आज पासून संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अकोट शहरात विना हेल्मेट दुचाकी चालकांविरोधात विशेष कारवाई सुरू करण्यात आली आहे. अकोट शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर जुनगरे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर नाकाबंदी करून हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली.

या मोहिमेदरम्यान दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व, वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृतीही करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात येत असून, ही कारवाई पुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलीस निरीक्षक किशोर जुनगरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, दंड टाळण्यासाठी नव्हे तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हेल्मेटचा वापर करा. प्रत्येक दुचाकीस्वाराने प्रवासादरम्यान हेल्मेट परिधान करून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे.

अकोट शहर पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांमध्ये चांगलीच धावपळ उडाली असून, नागरिकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर करण्याची गरज व्यक्त केली.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!