Ads

मूर्तीजापूर हादरले!कुटुंब झोपेत असतानाच घरात घुसून 4.35 लाखांचा ऐवज लंपास

By Nilesh Sir

July 30, 2026 9:50 am

Ads

अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर शहरातील आदर्श कॉलनी परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी घरफोडी करत नागरिकांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कुटुंबीय घरात गाढ झोपेत असतानाच अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख 3 लाख 20 हजार रुपये आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण 4 लाख 35 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी सेवानिवृत्त शिक्षक किशोर दिगांबर विधाते (वय 61) यांनी मूर्तीजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अप. क्र. 615/2026 अंतर्गत कलम 305 व 331(4) भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलैच्या मध्यरात्री ते 28 जुलैच्या सकाळी दरम्यान चोरट्यांनी घराच्या डाव्या बाजूच्या लोखंडी गेटची जाळी कापून कुलूप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडले. लॉकरमधील दोन सोन्याचे गोफ, चार सोन्याच्या अंगठ्या, दहा तोळ्यांचा चांदीचा गोफ आणि 3.20 लाखांची रोख रक्कम असा एकूण 4.35 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला.
विशेष म्हणजे, संपूर्ण कुटुंब घरात झोपलेले असताना ही चोरी झाली. त्यामुळे आदर्श कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी रात्रीच्या गस्तीसह सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी केली आहे.


घटनेची माहिती मिळताच मूर्तीजापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!