Ads

पातूरनंतर आता हिवरखेड हादरले! विषबाधेने 55 बकऱ्यांचा मृत्यू; मजूर कुटुंबांवर आर्थिक संकट

By Nilesh Sir

June 17, 2026 10:10 am

Ads

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात तांदळी येथे मेंढ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील मृत्यूची घटना ताजी असतानाच आता अकोट तालुक्यातील हिवरखेड येथे बकऱ्यांच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमरशेवडी शिवार परिसरात चारापाणी करत असताना अचानक विषबाधा झाल्याने सुमारे 50 ते 55 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

चारापाणी करताना अचानक बकऱ्यांना विषबाधा

मिळालेल्या माहितीनुसार, हिवरखेड येथील उमरशेवडी शेतशिवाराकडे जाणाऱ्या मार्गावरील फाटकाजवळ बकऱ्या चारापाणी करत असताना अचानक त्यांना विषबाधा झाल्याचे लक्षात आले. बकऱ्या चारणाऱ्या व्यक्तींनी तातडीने परिसरातील शेतकऱ्यांची मदत घेत काही बकऱ्यांना पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, तर अनेक बकऱ्यांनी घटनास्थळीच प्राण सोडले.

घटनेची माहिती मिळताच बकऱ्यांचे मालक घटनास्थळी धावले. अनेक मजूर कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार असलेल्या या बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

पशुवैद्यकीय विभागाचे शर्थीचे प्रयत्न

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अबोली कथे आणि कर्मचारी राजेश वायकर यांनी विषबाधाग्रस्त बकऱ्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यावेळी अनेक नागरिकांनी मदतकार्य केले.

दरम्यान, मंडळ अधिकारी डी. आर. झापे, तलाठी समीर खान आणि मोहन कुलाळ यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. नगरपरिषदेकडून मृत बकऱ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जेसीबीची व्यवस्था करण्यात आली.

लोकप्रतिनिधी आणि पोलिसांची घटनास्थळी भेट

भाजपचे रमेश दुतोंडे यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडे नुकसानग्रस्तांना मदत आणि नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. तसेच पोलिस निरीक्षक सचिन पाटील आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

शिवसेनेचे रवी घुंगळ, पत्रकार गणेश सुरजोस, बाळासाहेब नेरकर यांच्यासह अनेकांनीही घटनास्थळी धाव घेतली.

शवविच्छेदन अहवालानंतर कारण स्पष्ट होणार

मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, तपास अधिकाऱ्यांकडून पुढील अहवाल सादर करण्यात येणार आहे. विषबाधेमुळेच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

नुकसानग्रस्त मजूर कुटुंबांकडून नुकसानभरपाईची मागणी

या घटनेत अनेक गरीब आणि मजूर कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

पातूर तालुक्यातील तांदळी येथील मेंढ्यांच्या मृत्यूनंतर आता हिवरखेडमधील ही घटना समोर आल्याने अकोला जिल्ह्यात पशुधन सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Article

अकोट-अकोला काँक्रीट मार्गावरील भेगा बुजवण्याच्या कामाला वेग; पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने वाहनचालकांना मोठा दिलासा

आषाढी वारीपूर्वी मोठा निर्णय! 23 आणि 24 जूनला पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी पूर्ण बंद

माय-लेकराची अखेरची आंघोळ ठरली जीवघेणी; मंगरूळ कांबळे डॅम परिसरात हृदयद्रावक घटना

मामू लेट जा, तेरी तो वाट लगने वाली है! अकोला रेल्वे प्लॅटफॉर्मवर चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीती

शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांना महागाईचा धक्का! वह्या-पुस्तकांसह शालेय साहित्य महागले

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अकोल्यात भव्य वृक्षारोपण; ‘ग्रामीण स्वयंरोजगार शिक्षण संस्थे’चा स्तुत्य उपक्रम

No comments to show.

Leave a Comment