Ads

घरकाम करणारीच निघाली लाखोंची चोर! रामदास पेठ पोलिसांची झटपट कारवाई; ५ लाखांची रोकड जप्त”

By Nilesh Sir

May 25, 2026 4:23 pm

Ads

अकोल्यातील रामदास पेठ परिसरात घरकामासाठी ठेवलेल्या महिलेनेच घरातील लाखोंची रोकड चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र रामदास पेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी महिलेला ताब्यात घेत चोरीतील तब्बल ५ लाख रुपयांची रोकड जप्त करत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धार्थ शिवप्रकाश रुहाटीया (वय ४१) हे उद्योग व्यवसायाशी संबंधित असून दुर्गा चौक परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी मागील तीन महिन्यांपासून एक महिला घरकामासाठी येत होती. दि. २१ मे २०२६ रोजी रात्री व्यवसायातील ७ लाख ८७ हजार ५९० रुपयांची नगदी रक्कम घरी आणून आलमारीमध्ये ठेवण्यात आली होती.

दि. २३ मे रोजी सकाळी आलमारीतील संपूर्ण रक्कम गायब असल्याचे लक्षात येताच घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये घरकाम करणाऱ्या महिलेच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्याने रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी अप. क्र. ३९०/२०२६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी तातडीने विशेष पथक तयार केले. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित महिलेला महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपी महिलेने चोरीची कबुली दिली.

पोलिसांनी चोरीतील एकूण रकमेपैकी ५ लाख रुपयांची नगदी जप्त करण्यात यश मिळविले असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे, पो.उप.नि. निलेश गायकवाड, प्रदीप जोगदंड व त्यांच्या पथकाने केली.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!