Ads

भ्रष्टाचाराचा कळस! नाहरकत पत्रासाठी मागितली ६० हजारांची लाच!अकोल्यातील ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

By Nilesh Sir

May 25, 2026 2:43 pm

Ads

अकोला जिल्ह्यात भ्रष्टाचाराने पोखरलेल्या प्रशासनाविरोधात अखेर अँटी करप्शन ब्युरोने मोठी कारवाई करत लाचखोर अधिकाऱ्यांचे चेहरे उघडे पाडले आहेत. सामान्य नागरिकांची कामे अडवून पैशांची मागणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांमध्ये संताप वाढत असतानाच अकोला एसीबीने बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वाडेगाव ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडल्याने जिल्हा परिषद व ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाडेगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेला योगेश तोताराम कापकर आणि त्याच कार्यालयातील लिपिक सुभाष सरप यांनी एका व्यक्तीकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल ६० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. संबंधित तक्रारदाराला लाच द्यायची इच्छा नसल्याने त्याने अकोला येथील अँटी करप्शन ब्युरोकडे धाव घेत तक्रार नोंदवली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अकोला एसीबीच्या पथकाने आज सापळा कारवाई आयोजित केली. यावेळी ग्रामसेवक योगेश कापकर आणि लिपिक सुभाष सरप हे दोघेही लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ही कारवाई अकोला एसीबीचे उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी संदीप ताले आणि अस्लम शहा यांच्या पथकाने केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, सामान्य नागरिकांच्या कामांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!