Ads

अकोट शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; अवघ्या एका तासात मंगळसूत्र चोर गजाआड

By Nilesh Sir

May 23, 2026 3:38 pm

Ads

अकोट शहर बसस्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या टोळींचा धुमाकूळ सुरू असतानाच अकोट शहर पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या एका तासात मंगळसूत्र चोरी प्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरात पुन्हा एकदा अकोट पोलिसांच्या कार्यक्षमतेची चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेखा देवेंद्र सदार (वय ६०, रा. पिंपळोद, ता. दर्यापूर, जि. अमरावती) या त्यांच्या वहिनी संगीता विनोद फसाले यांच्यासोबत उपचारासाठी २० मे २०२६ रोजी अकोट येथे आल्या होत्या. उपचार आटोपल्यानंतर दोघी महिला दुपारी अंदाजे १ वाजताच्या सुमारास अकोट बसस्थानकावर पिंपळोदला जाण्यासाठी थांबल्या होत्या.

दरम्यान, अकोट ते यवतमाळ बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील ११.५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र चलाखीने तोडून लंपास केले. चोरी झाल्याचे लक्षात येताच महिलांनी तात्काळ अकोट शहर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

एका तासात आरोपी गजाआड

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अकोट शहर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. फिर्यादीने दिलेल्या आरोपीच्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी बसस्थानक परिसर आणि संशयित हालचालींची माहिती तपासत अवघ्या एका तासात आरोपीचा शोध लावला.

पोलिसांनी शैलेंद्र उर्फ बंडू सुरेश जाधव (वय ४४, रा. बलभीमनगर, जि. बीड) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली. त्याने चोरी केलेले सोन्याचे मिनी मंगळसूत्र बसस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एका दगडाखाली लपवून ठेवल्याची माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक

अकोट शहर पोलिसांनी दाखवलेल्या वेगवान आणि अचूक तपासामुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे चोरीनंतर काही तासांतच आरोपीला अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने महिलांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि सहायक पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक अमोल माळवे, पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते, समाधान मिसाळ यांच्यासह डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी ही धडाकेबाज कारवाई केली.

अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!