Ads

अकोल्यात उष्माघाताचा आणखी एक बळी?असदगड किल्ल्याजवळ बेवारस इसमाचा मृतदेह

By Nilesh Sir

May 19, 2026 10:45 am

Ads

अकोला शहरात वाढत्या प्रचंड उकाड्याने जीवघेणे रूप धारण केल्याचे चित्र समोर येत असून, जुने शहर पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या ऐतिहासिक असदगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका बेवारस इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. काल अकोल्यात तब्बल ४६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे संबंधित इसमाचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीकडे कोणतेही ओळखपत्र आढळून आले नसून तो परिसरातील रहिवासी नसल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सध्या राज्यभरात उष्णतेची लाट कायम असून अकोल्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, संबंधित इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सदर बेवारस इसमाची ओळख पटत असल्यास तात्काळ जुने शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!