Ads

अकोट ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेले जाणारे दोन बैलांना जिवदान , वाहनासह २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

By Nilesh Sir

May 18, 2026 9:54 pm

Ads

अकोट ग्रामीण पोलिसांनी जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत कत्तलीसाठी निर्दयतेने नेण्यात येणारे दोन बैलांची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मालवाहू वाहनासह एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ मे २०२६ रोजी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अंजनगाव रोडवरून अकोटकडे एका मालवाहू वाहनातून कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक केली जाणार आहे. या खात्रीलायक माहितीनंतर पोलिसांनी दोन पंचांसमक्ष वाई फाट्याजवळ जिनिंगसमोर नाकाबंदी केली.

दरम्यान, अंजनगाव रोडकडून येणाऱ्या एका मालवाहू चारचाकी वाहनाला थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने वाहन थेट शेतात घालून लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संशयावरून वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन पांढऱ्या रंगाचे बैल अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून बांधलेले आढळून आले. जनावरांच्या चाऱ्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती तसेच त्यांना दोरखंडाने ट्रॉलीच्या अँगलला बांधण्यात आले होते.

पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव शेख बिस्मिल्ला शेख हारूण (वय २४, रा. जोड मारोती मंदिर जवळ, अजीजपुरा, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) असे सांगितले. गोवंश वाहतुकीबाबत विचारणा केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासादरम्यान सदर जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची खात्री पटली.

तसेच वाहनामध्ये प्राथमिक उपचार पेटी नसल्याचे आणि जनावरांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसल्याचेही समोर आले. पोलिसांनी आरोपीकडून दोन बैल आणि MH 37 T 3259 क्रमांकाचे महिंद्रा सुप्रो वाहन असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या गोवंशाची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पालनपोषणासाठी गोरक्षण संस्था, अकोट येथे दाखल करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, पोउपनि वैभव तायडे आणि त्यांच्या पथकाने केली.

Related Article

प्रेमाचा करुण अंत! विहिरीत उडी घेतलेल्या प्रियकराचा मृत्यू; तरुणीनेही केले विषप्राशन

सातपुड्याच्या हिरवाईला दारूच्या बाटल्यांचा डाग!पावसाळी पर्यटनाच्या नावाखाली मद्यपानाचा धुमाकूळ?

सातपुड्याच्या ‘एंट्री गेट’वरच CCTV बंद! पोपटखेड तपासणी नाका वनविभागाच्या भरवशावर; सुरक्षेवर गंभीर सवाल

रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पाच वर्षांनी हरवलेल्या महिलेची कुटुंबीयांशी पुनर्भेट; आधार ठरला शोधाचा महत्त्वाचा दुवा

हिवरखेडमध्ये महायुतीचा ‘महासंग्राम’! भाजप-शिंदेसेना आमनेसामने; नगरपालिकेत जोरदार राडा

दानापूरमध्ये ईद-ए-मिलादचा जल्लोष! आकर्षक देखाव्यांसह भव्य मिरवणूक; सामाजिक सलोखा अन् बंधुभावाचे दर्शन

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!