Ads

बोरगाव मंजूमध्ये थरार! धारदार शस्त्राने युवकावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By Nilesh Sir

May 18, 2026 8:44 am

Ads

बोरगाव मंजूतील रेणुका नगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला असून जखमी युवकावर अकोल्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी युवक पंकज याने उपचारादरम्यान दिलेल्या माहितीत बोरगावमधीलच श्याम ठाकरे, ओम वाघमारे आणि रितेश यादव यांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध जीव घेण्याच्या उद्देशाने गंभीर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक सक्रिय करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

स्थानिक नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत चिंता व्यक्त करत पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!