Ads

उगवा फाटा येथे भक्तीचा पंचम संगम; अधिक मासानिमित्त ‘श्रीमंत भागवत कथा’ आणि ‘अखंड हरिनाम सप्ताहा’चा सोहळा!

By Nilesh Sir

May 16, 2026 4:32 pm

Ads

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक १६ मे २०२६ :- अकोल्याच्या आध्यात्मिक वैभवात आज एका मोठ्या सोहळ्याची भर पडतेय. श्री क्षेत्र उगवा फाटा येथे अधिक मास, मुक्ताबाई दिंडीचा रौप्य महोत्सव, श्रीराम महाराज मेहुनकर यांच्या जन्मशताब्दी, तसेच श्री.1008 स्वामी ब्रह्मस्वरूपानंद गिरीजी महाराज,उगवा आश्रम यांच्या सोळशी वर्षपूर्ती निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १७ मे २०२६ पासून या मंगलमय ‘अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीमंत भागवत कथे’ला सुरुवात होत आहे.

अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक केंद्र, श्री क्षेत्र काशीविश्वनाथ मुक्तेश्वर संस्थान, उगवा फाटा येथे भक्तीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतोय. निमित्त आहे १६ पुण्य पावन क्षेत्रांमधील तीर्थयात्रा तपोपूर्ती सोहळा आणि अधिक मासाचे! यावर्षीचा हा सोहळा केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून, यात भक्तीचा पंचम संगम पाहायला मिळत आहे.

श्री संत मुक्ताबाई दिंडीचा ‘रौप्य महोत्सव’ आणि वैकुंठवासी गुरुवर्य श्रीराम महाराज मेहुनकर यांचे ‘जन्मशताब्दी वर्ष’ तसेच श्री.1008 स्वामी ब्रह्मस्वरूपानंद गिरीजी महाराज,उगवा आश्रम यांची सोळशी वर्षपूर्ती अशा ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘अखंड हरिनाम सप्ताह’ आणि ‘संगीतमय श्रीमंत भागवत कथे’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

श्री संत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज कोल्हापूर पीठ यांच्या उपस्थितीमध्ये संत महंत महामंडलेश्वर , सोळशी वर्षपूर्ती सोहळा 1008 स्वामी स्वामी ब्रह्मस्वरूपानंद गिरीजी महाराज (उगवा आश्रम) यांचा सोहळा पार पडणार आहे. सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी पहाटेच्या काकडा आरतीपासून ते रात्रीच्या जागरपर्यंत संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमणार आहे. सकाळी ९ ते १२ आणि दुपारी २ ते ३:३० या वेळेत रसाळ भागवत कथेचे श्रवण भाविकांना करता येईल.

तसेच ४ ते ६ या वेळेत हरीकीर्तन होणार आहेत यामध्ये श्री. ह.भ.प. महंत. लक्ष्मणदासजी महाराज श्रीराम आश्रम अयोध्याधाम , प.पु.गु.१०८ महंत स्वामी सुरेश्वरानंद गिरीज महाराज, आंबोळा, अकोट , श्री. ह.भ.प.परमपुज्य १००८ स्वामी अवधुतपुरी महाराज कर्नाटक, गांडगापुर, श्री. ह.भ.प.परमपुज्य १०८ स्वामी आदित्यनाथ भारती महाराज, देवाची आळंदी, श्री. ह.भ.प.गु. गोपाळ महाराज वारकरी भुषण, उरळकर ,प.पु.गु. १००८ महंत वेदांतचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज, सांदीपन आश्रम, उज्जैन, निमगांव , तसेच 23 मे रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत प्रवचन व पूजन श्री परमपुज्य अभिनव विद्यानृसिंह भारती स्वामी महाराज, करवीर पीठ कोल्हापुर , श्री.ह.भ.प. १००८ प.पु. महंत स्वामी ब्रम्हस्वरुपानंद गिरीजी महाराज, उगवा आश्रम यांसारख्या दिग्गज वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांची वाणी भाविकांना मंत्रमुग्ध करणार आहे.

परिसरातील अनेक गावांतील भाविक आणि महिला सेवाधारी मंडळे या अन्नदान व सेवा कार्यात हिरिरीने सहभागी झाले आहेत. सप्ताहाच्या सांगता दिनी म्हणजेच रविवार, २४ मे रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत श्री.ह.भ.प. १००८ प.पु. महंत स्वामी ब्रम्हस्वरुपानंद गिरीजी महाराज, उगवा आश्रम यांचे काल्याचे कीर्तन आणि भव्य महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होईल. या अलौकिक आध्यात्मिक उत्सवाचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

या श्रीमंत भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे थेट प्रक्षेपण Shree Live (श्री लाईव्ह) आणि Ann Akola News Network ( अकोला न्यूज नेटवर्क) या दोन्ही चॅनल वर होणार आहे दररोज वेळ: सकाळी ९ ते १२, दुपारी २ ते ३:३० (कथा) आणि ४ ते ६ (कीर्तन).

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!