Ads

सिनेस्टाईल पाठलाग करत SDPO निखिल पाटील यांनी उधळला गोवंश तस्करीचा डाव;

By Nilesh Sir

May 16, 2026 10:28 am

Ads

अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न पोलिसांनी धाडसी कारवाई करत उधळून लावला आहे. विशेष म्हणजे, अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांनी स्वतः सिनेस्टाईल पाठलाग करत संशयित वाहन अडवत ही कारवाई केल्याने जिल्ह्यात पोलीस दलाच्या सतर्कतेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यानुसार, गोपाळखेड परिसरातून एका पांढऱ्या रंगाच्या गोऱ्याला कारमध्ये टाकून नेत असल्याचे फिर्यादी अशिष विजय वानखडे यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या भाऊ आणि मित्रांसह वाहनाचा पाठलाग सुरू केला. याचदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांचे जिल्हा गस्त सुरू असल्याने नागरिकांनी तात्काळ माहिती पोलिसांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील हे जिल्हा गस्त घालत असताना संशयित वाहनाची माहिती मिळताच त्यांनी स्वतः कारवाईची सूत्रे हाती घेतली. पोलिसांनी संशयित वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. अखेर अकोट फाईल परिसरातील एका गल्लीमध्ये संशयित वाहन पंक्चर झाल्याने थांबले.

वाहन थांबताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून एका आरोपीला ताब्यात घेतले, तर इतर तीन आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी वाहनातून गोरा सुखरूप बाहेर काढत कार जप्त केली आहे.

या प्रकरणी अजमत शहा, अप्प्या, अमिर आणि कादर यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनासह एकूण 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या सतर्कतेमुळे आणि अंगरक्षक आणि चालक धाडसी कारवाईमुळे गोवंश तस्करीचा मोठा डाव उधळला गेल्याची चर्चा आता जिल्हाभर रंगली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास दहीहंडा पोलीस करत आहेत.

Related Article

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

पातूरमध्ये शाळेतील प्रवेशासाठी १० ते १५ हजार रुपयांची मागणी? खासगी शाळांवर पालकांचे गंभीर आरोप

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!