Ads

NEET-UG 2026 परीक्षा अखेर रद्द!पेपरफुटीच्या आरोपांनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

By Nilesh Sir

May 12, 2026 12:42 pm

Ads

देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET-UG 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. पेपरफुटीच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

यंदाची NEET परीक्षा पार पडल्यानंतर राजस्थानसह काही राज्यांतून प्रश्नपत्रिका लीक झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. समाजमाध्यमांवर परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचा दावा अनेक विद्यार्थ्यांनी केला होता. प्राथमिक चौकशीत काही प्रश्न “गेस पेपर”शी जुळत असल्याचे समोर आल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर बनले.

सुरुवातीला NTA कडून पेपरफुटीचे आरोप फेटाळण्यात आले होते. मात्र केंद्रीय तपास यंत्रणांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनंतर अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

दरम्यान, परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र येत्या १५ दिवसांत नवीन वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ NTA च्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी महिनोनमहिने मेहनत घेत परीक्षा दिली होती. आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार का? प्रवेश प्रक्रिया किती लांबणार? असे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले आहेत.


Related Article

अकोल्यातील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट लवकरच सुरू होणार? उड्डाणपूल जानेवारीअखेर खुला करण्याचे निर्देश

दुष्काळाचा बाजारपेठेला फटका! अकोल्यात डाळींच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ; तांदळाचे दरही गगनाला

संगीता कुशवाह मृत्यू प्रकरण: सासरच्या तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; सरकारी वकिलांचा युक्तिवाद ठरला महत्त्वाचा

दुचाकी-ट्रकची जोरदार धडक; २२ वर्षीय युवक गंभीर जखमी, प्राथमिक उपचारानंतर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविले

अकोला जिल्ह्यात दुष्काळी पंचनाम्यांना वेग; आतापर्यंत 1.85 लाख शेतकऱ्यांच्या 3.06 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे

महिला सक्षमीकरणाला बाळापूर नगरपालिकेची चालना; १०० महिलांना शिलाई प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!